उबरची स्पीडबोट सेवा, गेटवे ते मांडवा काही मिनिटांत | मुंबई | एबीपी माझा
मुंबईसह महानगरांमध्ये टॅक्सीसेवा देणारी 'उबर' आता जल वाहतुकीतही उतरली आहे. टॅक्सीसोबतच उबरची बोट सर्व्हिस सुरु होणार आहे. गेट वे ऑफ इंडियापासून मांडवा जेट्टी आणि एलिफंटा लेण्यापर्यंत आपण या उबर बोटीने प्रवास करु शकतो. येत्या एक फेब्रुवारीपासून ही सेवा सुरु होईल. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेटी हे 19 किमी अंतर आहे. स्पीड बोट असल्यामुळे अतिशय कमी वेळेत गेटवेहून मांडवा आणि एलिफंटापर्यंत पोहचता येईल.