नाशिक मनपाचे दोन अतिरिक्त आयुक्त तुकाराम मुंढेंना कंटाळले!
नाशिक महानगरपालिकेतील दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी बदलीसाठी अर्ज केला आहे. विद्यमान महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे मनपातील अनेक अधिकारी कर्मचारी तणावात असल्याची चर्चा आहे. त्यातच अतिरिक्त आयुक्तांनीच बदलीचा अर्ज केल्यानं खळबळ उडाली आहे.