तुळजापूर, उस्मानाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुन्हा एल्गार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच दुसरं पर्व आजपासून सुरु झालं आहे. आज तुळजाभवानीच्या दरबारातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यापूर्वी मराठा समाजानं शांततेच्या मार्गानं राज्यभरात ५८ विक्रमी मोर्चे काढले होते. मात्र, तरीही आश्वासनं आणि कागदी घोडे नाचवण्यापलिकडे काहीही झालं नाही. त्यामुळे मराठा समाजानं पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. आज तुळजापुरात भवानी रोडवरील महाद्वारासमोर जागरण गोंधळ करण्यात आला आणि तुळजापूर शहरातून मोठी रॅली काढण्यात आली.