Donald Trump Tweet | अमेरिकेच्या कारवाईत आयसिसचा म्होरक्या बगदादी ठार? | ABP Majha

Continues below advertisement
आताच काही तरी मोठं घडलंय अशा आशयाचे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटनंतर जगभरात चर्चांना उधाण आलंय. आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीला ठार करण्यासाठी आयसिसने मोठी मोहीम हाती घेतलीय. या कारवाईत बगदादी मारला गेल्याची शक्यता अमेरिकन माध्यमांमध्ये रंगलीय. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या ट्विटनंतर ट्रम्प याबाबत अधिकृत घोषणा करतील असं बोललं जातंय. याआधीही अनेकदा बगदादी मारला गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram