New Motor Vehicle Act | दिल्लीत ट्रक चालकाला 2 लाख 500 रुपयांचा दंड | ABP Majha
Continues below advertisement
दिल्लीमध्ये एका ट्रक चालकाला चक्क 2 लाख 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नवीन मोटर वाहन कायद्यानुसार हा दंड आकारण्यात आला. दिल्लीतील मुकरबा चैकात ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजनाचं सामान भरल्याने हा दंड आकारला आहे. आजपर्यंतचा सर्वात जास्त आकारण्यात आलेला हा दंड मानला जात आहे. याआधी राजस्थानमध्ये एका ट्रक चालकाला 1 लाख 41 रुपयांचा दंड आकारला होता.
Continues below advertisement