नवी दिल्ली : नकोसे मेसेज आणि कॉलवर नजर ठेवण्यासाठी ट्रायची नवी नियमावली
मोबाईलवर दररोज येणाऱे नकोसे कॉल आणि मॅसेजमुळे आपण सर्वजण अक्षरश: वैतागतो...मात्र आता लवकरच या नकोशा कॉल आणि मेसेजपासून तुमची-आमची सुटका होणार आहे. कारण हे मॅसेज आणि केले जाणारे कॉल रोखण्यात अपयशी ठरलेल्या टेलिकॉम कंपन्यांना दंड आकारण्यात येऊ शकतो. दूरसंचार नियामक प्राधिकरणानं अशा प्रकारच्या कॉल्सवर करडी नजर ठेवण्यासाठी नियमावली तयार केली आहे. साधारण देशातील टेलिकॉम नेटवर्कवर दर महिन्याला जवळपास 30 अब्ज नकोशे मेसेज येत असतात. ते रोखण्यासाठी आणि त्याबाबत तयार केलेल्या नियमावलीवर 'ट्राय'नं भागधारकांकडून 11 जूनपर्यंत मते मागवली आहेत.