मुंबई : TRAI च्या निर्णयामुळे भारतातील सर्व आयफोन बंद होणार?
Continues below advertisement
जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपल आणि ट्राय यांच्यात डीएनडी अॅपवरुन खडाजंगी सुरु आहे. स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी अॅपलने डीएनडी अॅप इन्स्टॉल करावं अशी ट्रायने मागणी केली आहे. मात्र आपल्या युजर्सच्या गोपनियतेसाठी अॅपलने ट्रायची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ट्राय आणि अॅपलच्या भांडणात अॅपलचे फोन बंद होतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. ट्रायने 19 जुलैपासून लागू केलेल्या नव्या नियमानुसार, सर्व मोबाईल फोनमध्ये डीएनडी अॅप इन्स्टॉल असावं ज्यामुळे फ़ेक कॉल्स आणि स्पॅम मेसेज रिपोर्ट करण्याची परवानगी युजरला मिळू शकेल. ट्रायने नियमाचं पालक करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना सहा महिन्याची मुदत दिली आहे. ट्रायने 2017मध्ये फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजचा त्रास मोबाईल वापरकर्त्यांना होऊ नये यासाठी या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप सध्या अॅन्ड्रॉईडच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र अॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅपला जागा दिली नाही.
Continues below advertisement