Election Special | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी विशेष चर्चा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
Continues below advertisement
'काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं तर राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री झाले असते', असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात केलं. डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात आज धनंजय मुंडे सहभागी झाले होते. "राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेचे विरोधीपक्षनेते आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं तर विखे पाटील मुख्यमंत्री झाले असते. ही गोष्ट त्यांच्या चिरंजीवांच्या लक्षात आली नाही", असं मुंडे म्हणाले. लोकसभा निवडणूकीच्या तयारीबाबत बोलताना मुंडे म्हणाले, "भाजप-शिवसेनेची युती झाली नव्हती तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सभा सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे जवळपास सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत आम्ही प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजप सेनेची तर अजून यादी यायची बाकी आहे".
Continues below advertisement