प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी, राज्यात कुठे किती दंडाची वसुली?
Continues below advertisement
पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लॅस्टिकला हद्दपार करण्यासाठी आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे. राज्यातल्या अनेक शहरांमध्ये प्लॅस्टिकजप्तीची कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरु झालीय. यात प्रशासनानं सर्वाधिक दंड नाशिक महापालिकेच्या हद्दीत गोळा केलाय. दरम्यान, प्लॅस्टिकबंदीसाठी सरकारनं दंडात्मक कारवाई निश्चित केली आहे. यात तुमच्याकडे पहिल्यांदा प्लॅस्टिक आढळल्यास ५ हजार, दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार आणि तिसऱ्यांदा आढळल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी तुमच्याकडे असलेलं प्लॅस्टिक संकलन केंद्रात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे तुमच्याकडे प्लॅस्टिक असेल, तर सावधान... कारण प्लॅस्टिक आढळल्यास तब्बल ५ हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. दरम्यान, कोणतीही पर्यायी व्यवस्था नसताना लागू केलेल्या या बंदीवर सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांकडून टीका होतेय.