National Status | राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भाकपचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार? | ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या राष्ट्रीय दर्जासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आयोगाने या तिन्ही पक्षांना नोटीस देऊन त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगीतलं होतं. यानुसार, काँग्रेसनंतर देशातला सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा सीपीआयने केला आहे. तर किमान 2024पर्यंत पक्षाचा राष्ट्रीय दर्जा राहिला पाहिजे, अशी बाजू तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगासमोर मांडली आहे.
Continues below advertisement