ठाणे : टिटवाळ्यातील काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडली
मुंबईतल्या टिटवाळ्यातील काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आसपासच्या 20 गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. नदीचं पाणी पात्राबाहेर पडून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.