टिटवाळा | 45 दिवस मेहनत घेऊन उभारला पाच लाखांचा देखावा
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडून उभारले जाणारे भव्य देखावे हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात... टिटवाळ्यात रत्नाकर पाटील या गणेशभक्तानं घरगुती गणपतीसाठी साकारलेला भव्य देखावा सध्या आकर्षणाचा विषय ठरलाय... पाटील यांनी त्यांच्या घरगुती गणेशोत्सवात तिरुपती बालाजी मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि गोकुळ धाम मंदिराची प्रतिकृती उभारलीय... यासाठी त्यांनी ४५ दिवस मेहनत करुन तब्बल ५ लाख रुपये खर्च केले...