पालघर : सोबती पॅरेंट्स असोसिएशनचा 11 वा वर्धापनदिन साजरा
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यातील तिळसे गावात सोबती पॅरेंट्स असोसिएशनचा 11 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. अंध आणि बहुविकलांग असलेल्या मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन 2004 साली सोबती पॅरेंट्स असोसिएशनची स्थापना केली होती.
तिळसेमध्ये असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात अंध आणि बहुविकलांग मुलांना आठवड्यातील 5 दिवस व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. या मुलांनी आपल्या पायावर खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे या उद्देशाने ही संस्था सदैव काम करत असते. या मुलांना शिकवणे त्यांना प्रशिक्षण देणे हे कठीण असूनही नवनवीन प्रयोग करून अंध आणि विकलांग मुलांची वेगळी वाटचाल निर्माण करण्याची महत्वकांक्षा संस्थेचे संस्थापक प्रकाश बाळ यांनी व्यक्त केली.