BEST BUS | बेस्टच्या प्रवासासाठी 5 किमी अंतरासाठी आता फक्त 5 रुपये मोजावे लागणार | मुंबई | ABP Majha
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसच्या तिकीट दरात कपात होणार आहे. प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी 'बेस्ट' उपक्रमाने नव्या भाडेदराचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे बेस्ट बसचं किमान भाडं आठ रुपयावरुन पाच रुपये केलं आहे. पाच किमी अंतरासाठी मुंबईकरांना पाच रुपये भाडं द्यावं लागणार आहे.
बेस्ट समितीच्या आज झालेल्या बैठकीत नव्या तिकीट दराला मंजुरी देण्यात आली. सध्या बेस्टचे किमान भाडे आठ रुपये आहे. मागील काही वर्षांत उत्पन्न वाढीसाठी आणि वाढत्या खर्चांचा मेळ घालण्यासाठी बेस्टच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. आता मुंबईकरांना आठ ऐवजी पाच रुपये मोजावे लागणार आहेत.