अयोध्या | बाबरी मशिद खटल्यातील पक्षकार इक्बाल अंसारी यांना धमकीचे पत्र
अयोध्येतल्या बाबरी मशिद-रामजन्मभूमी वादाच्या खटल्यातील पक्षकारांपैकी एक असलेल्या इक्बाल अंसारी यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. हे धमकीचे पत्र पाठविणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अमेठीतून अटक केले आहे. या पत्रात अंसारी यांना धमकावत केस मागे घेण्यासह आणखी काही वादग्रस्त मुद्यांचा उल्लेख केला आहे. धमकीचे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव सूर्य प्रकाश सिंह असून तो विश्व हिंदू परिषदेचा गोरक्षा प्रमुख असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने त्याचा पत्ता दादरा, मुसाफिरखाना, अमेठी असा सांगितला होता. या पत्त्यावर पोहोचून पोलिसांनी सूर्यप्रकाशला अटक केली आणि फैजाबाद पोलिसांना सोपविले.