Thomas Cook | जगातील सगळ्यात मोठी आणि जुनी ट्रॅव्हल्स कंपनी 'थॉमस कुक' रातोरात बंद | ABP Majha

Continues below advertisement
जगातील सगळ्यात मोठी आणि जुनी ट्रॅव्हल्स कंपनी थॉमस कुक रातोरात बंद करण्यात आलीय. 178 वर्षे जुनी असलेली ही ब्रिटीशकालीन टूर ऑपरेटर कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक परिस्थितीशी झगडत होती. रातोरात गाशा गुंडाळल्यामुळे या कंपनीत काम करणाऱ्या 21 हजार जणांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळलीय. रॉयल बँक ऑफ स्कॉटलँडने या कंपनीला मोठा झटका दिलाय. कंपनीने 20 कोटी पाऊंडच्या अतिरिक्त निधीची मागणी केली होती. मात्र आरबीएसने तो निधी देण्यास नकार दिला. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीला मदत करणाऱ्या आरबीएसने नकार दिल्याने थॉमस कूकच्या उरल्या सुरल्या अपेक्षाही संपुष्टात आल्या. त्यामुळे कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram