जपानमध्ये मांजरासाठी खास 'कॅट कॅफे' रेल्वे सुरु
जपानमधील लोक मांजरांवर अतिशय प्रेम करतात. आता हेच पाहा ना त्यांनी खास मांजरांसाठी एक रेल्वे सुरु केली. ‘कॅट कॅफे’नावाच्या या रेल्वेत पहिल्याच दिवशी ३० मांजरी आणि ४० प्रवासी होते. यावेळी प्रवासी मांजरांसोबत खूप खेळले. फोटो काढले आणि या प्रवासाचा आनंद घेतला.