'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, रिलीजचा मुहूर्तही ठरला!
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील बेतलेल्या 'ठाकरे' या सिनेमाचा आज मोठ्या थाटामाटात टीझर लाँच करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरचं लाँचिंग करण्यात आलं. हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे.