ठाणे : दुरुस्तीच्या कामासाठी मुंब्रा बायपास 2 महिने बंद, शिळफाट्याजवळ मोठी वाहतूक कोंडी
ठाण्यातल्या मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळं आज सकाळपासून ऐरोली, शिळफाटा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. काल रात्रीपासून हा बायपास बंद आहे. येते २ महिने हा बायपास दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. रस्त्याच्या कामासाठी ठाण्यात येणारी जड वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे तर कल्याणहून भिवंडीला जाणारी वाहतूक शीळफाटामार्गे वळवण्यात आलीय..त्यामुळं या दोन्ही रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.