मुंबई : लवकरच ठाण्याहून मुंबई आणि पनवेलपर्यंत जलमार्ग
Continues below advertisement
जलवाहतुकीचे दोन्ही टप्पे पूर्ण केल्यानंतर घोडबंदर येथून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे केवळ एका तासात पोहचणे शक्य होणार आहे. जलवाहतुकीच्या ठाणे-कल्याण-वसई या फेज-1 ला केंद्राची तसेच राज्याची तत्त्वत: मान्यता मिळाल्यानंतर, आता फेज-2 चा डीपीआर तयार करण्याचे काम सुरु झाले आहे.
ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा फेज-2 चा जलमार्ग आहे. याचा शक्याशक्यता अहवाल तयार केला असून तो 24 एप्रिल रोजी सादर केल्यानंतर डीपीआर तयार करण्याची अनुमती राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील जलवाहतुकीमुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा भार 20 टक्क्यांनी हलका होणार असून, घोडबंदरहून मुंबईला जाण्यासाठी सध्या दोन तास लागतात, तोच प्रवास एक तासात पूर्ण होईल असा दावा केला जातो आहे.