ठाणे : ठाणे स्टेशन मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचं स्टेशन
Continues below advertisement
ठाण्याचं रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेवरचं सर्वाधिक गर्दीचं स्टेशन ठरलं आहे. याआधी डोंबिवली सर्वाधिक गर्दीचं स्टेशन म्हणून ओळखलं जायचं. मात्र यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत ठाण्यावरुन प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत 12 हजार 668 जणांची वाढ झाली आहे. उपनगरांचा विस्तार वाढतच असल्यामुळे बदलापूर, उल्हासनगर इथून प्रवास करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे.
Continues below advertisement