ठाणे : आवाज सहन न झाल्याने शाळा विश्वस्तांच्या पत्नीची विद्यार्थ्यांना मारहाण
वार्षिक स्नेहसंमेलनाचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज शाळेच्या ट्रस्टींच्या पत्नीला सहन झाला नाही. याच चिडचिडीतून महिलेने 18 विद्यार्थ्यांना फायबारच्या काठीने मारल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. शाळेचे विश्वस्त गौतम यांची पत्नी शिल्पा गौतम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.