ठाणे : सरकारी रुग्णालयातून अपहरण झालेले अर्भक सुखरुप, आरोपी महिलेला डोंबिवलीतून अटक
Continues below advertisement
ठाण्यातल्या सरकारी दवाखान्यातून अपहरण झालेल्या बाळाला पोलिसांनी अवघ्या काही तासांत सुखरुप शोधून काढलं. आणि हे बाळ त्याच्या आईकडे सोपवण्यात आलं. आरोपी महिलेला डोंबिवलीतून अटक करण्यात आली आहे. शिवाय कारवाई दरम्यान पोलिसांना महिलेकडे 4 लहान मुलं सापडली आहेत. सध्या ही मुलं त्या आरोपी महिलेची आहेत की, चोरी केलेली आहेत याचा तपास सुरु आहे. हा संपूर्ण प्रकार रविवारी पहाटे घडला होता. या घटनेनंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र एका सरकारी दवाखान्यातून इतक्या सहजपणे अर्भकाचं अपहरण होतचं कसं? सरकारी दवाखान्यांची सुरक्षा रामभरोसे आहे का? असाच सवाल आता निर्माण झाला आहे.
Continues below advertisement