ठाणे: सेंट झेवियर्सच्या स्कूल व्हॅन चालकाचं प्रसंगावधान
Continues below advertisement
ठाण्यात मराठा आंदोलनदरम्यान सेंट झेवियर्स स्कूलचे 8 विद्यार्थी अडकले होते. मात्र व्हॅनचालक दत्ताराम पवार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे हे विद्यार्थी सुखरुप बचावले. आंदोलनकर्ते दगडफेक करत असताना चालक दत्ताराम पवार यांनी व्हॅन एम्पायर या इमारतीत घेतली. त्यानंतर इमारतीमधील रहिवाशीही तात्काळ मदतीला धावले. रहिवाशांनी घाबरलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या घरात घेतलं. त्यांना खाऊपिऊ घातलं. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करुन बोलावलं घेतलं. या सगळा प्रसंग सांगताना दत्ताराम पवार यांच्या डोळ्यात पाणी तराळलं होतं.
Continues below advertisement