ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरील रस्त्याला तडे
सततच्या मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या साकेत पुलावर रस्त्याला तडे गेलेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ठाण्याकडे येणारी अवजड वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. मुंबई - नाशिक महामार्गावर ठाण्याच्या खाडीवर साकेत पूल आहे. या पुलावर नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर दोन गर्डरच्या मधोमध रस्त्याचा काही भाग काल मध्यरात्रीच्या सुमारास खचला आणि संपूर्ण रस्त्याला मोठा तडा गेला. या तड्यामुळे पुलाला काहीही धोका नसला, तरी अवजड वाहनांमुळे रस्ता ढासळण्याची भीती आहे. त्यामुळे या खचलेल्या भागावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पोलिसांनी अन्य मार्गाने वळवली आहे. तर रस्त्यावर काही भागात बॅरिकेड्स लावण्यात आल्यामुळे इतर वाहनांचाही वेग मंदावला आहे.