ठाणे | वर्षा मॅरेथॉन | 21 किमी मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकचा रणजित कुमार पटेल विजयी
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला सुरुवात झालीय. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही 29वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन आयोजित करण्यात आलीय. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फ्लॅगऑफ केल्यानंतर मॅरेथॉनला सुरुवात झाली. देशभरातून मोठ्या संख्येनं स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले असून ठाणेकरांचा उत्साह आपल्याला दिसतोय. यंदा मॅरेथॉनच्या माध्यमातून प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला आहे.