नागपूर : ठाणे स्टेशनच्या विस्ताराला आरोग्य विभागाची जागा देण्यास मंजुरी

Continues below advertisement
गेली अनेक वर्षे शिवसेना पाठपुरावा करत असलेल्या विस्तारित ठाणे स्थानक प्रकल्पाचे आणखी एक पाऊल पुढे पडले असून या प्रकल्पासाठी आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील मनोरुग्णालयालगतची जागा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी नागपूर येथे मंजुरी दिली. दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या ठाणे स्थानकाची क्षमता संपली असून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram