मुंबई : ठाणे आणि पालघरमधील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी

Continues below advertisement
.तुम्ही जर ठाणे, पालघर किंवा रायगडला पर्यटनाला जाणार असाल तर तुमची निराशा होऊ शकते. कारण या तिनही जिल्हांमधील धबधबे, तलाव आणि धरणांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यांतील धोकादायक पर्यटन स्थळांच्या परिसरात जाण्यास 31 जुलैपर्यंत मनाई आहे. तर पालघर जिल्ह्यातही पुढील दोन महिने पर्यटन बंदी असणार आहे. तर रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आणि खोपोलीत पर्यटन स्थळांवरही 4 सप्टेंबरपर्यंत पर्यटनकांनी बंदी घालण्यात आली. पर्यटनाचा आनंद घेण्याच्या नादात काही अतिउत्साही पर्यटकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्यात.. त्याच पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली जात आहे... दरम्यान, आता पर्यटनासाठी कुठे जायचं असा प्रश्न पर्यटक उपस्थित करतायेत.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram