ठाणे : पक्षांतर्गत कुरघोडीला कंटाळून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी : निरंजन डावखरे

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी आमदारकीचा राजीनामा देत पक्षालाही सोडचिठ्ठी दिलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सकाळी 11 वाजता त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे. निरंजन डावखरे हे कोकण विधान परिषद मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडील वसंत डावखरे यांच्या निधनानंतर निरंजन हे एकाकी पडल्याचं बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर निरंजन डावखरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram