ठाणे: हातगाडीवर दुचाकी, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
Continues below advertisement
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपेंनी चक्क हातगाडीवर दुचाकी ठेऊन ती ओढली. महागाईला विटलेली जनताच या सरकारला महाग झालेल्या इंधनामध्ये जाळेल अशी टीका परांजपे यांनी केलीये. सध्या पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वमान्यांमध्ये सरकारविरोधात संतापाचं वातावरण आहे.
Continues below advertisement