ठाणे : फर्जंद चित्रपटाला एकही प्राईम टाईम शो नाही; राष्ट्रवादी, मनसेचं आंदोलन
Continues below advertisement
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फर्जंद' या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या वतीनं ठाण्याच्या मल्टिप्लेक्स चालकांना समाज देण्यात आली. ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉल मधील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे दिवसाला दोन शो असून काही ठिकाणी दिवसाला अवघा एक शो देण्यात आलाय. त्यामुळे मराठी चित्रपटरसिक चांगल्या चित्रपटांना मुकत असून चित्रपट निर्मात्यांचंही नुकसान होतं आहे. त्याची तातडीने दाखल घेत राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते व्हिव्हियन मॉलवर धडकले. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीनं रविवारचा, तर मनसेनं आजचाच अल्टिमेटम मॉप्लेक्स चालकाला दिला.
Continues below advertisement