ठाणे : एके-56 आणि दोन पिस्तुलं घरात बाळगल्याप्रकरणी दाम्पत्याला अटक
Continues below advertisement
ठाणे क्राईम ब्रांचने एका घरातून एके ५६ रायफल आणि दोन पिस्टल जप्त करण्यात आल्यायेत. तसच घरमालक नईम फाहीम खान आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आलीये. २ जुलैला पोलिसांनी ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या चौकशीत पोलिसांना माहिती मिळाली होती. दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही छापेमारी केलीये. बंदूर नगरमध्ये ही कारवाई करण्यात आलीये. घरमालक नईम खानचे छोटा शकील सोबत देखील संबंध आहेत.
Continues below advertisement