ठाणे : झोपडपट्ट्यांचं रुपडं पालटणार, घरांना विविध रंग
Continues below advertisement
ठाणे शहरात वाढणाऱ्या झोपडपट्टींचं रुपडं पालटण्यासाठी आता महापालिकेनं कंबर कसली आहे. शहरातील झोपडपट्ट्यांना विविध रंगांच्या माध्यमातून रंगवण्यास पालिकेनं सुरुवात केली आहे. वागळे इस्टेट भागातून या उपक्रमाला पालिकेने सुरुवात केली आहे. या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यांबद्धल जागृती केली जाणार आहे. भविष्यात याच चाळ वजा झोपडपट्टी मध्ये पालिकेच्या वतीने स्वच्छता आणि किमान सुविधा पुरविल्या जाणार आहेत काल ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या झोपडपट्टयांची पाहणी केली
Continues below advertisement