ठाणे : मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीला सोमवारपासून सुरुवात
Continues below advertisement
ठाण्यातील मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अखेर सोमवार म्हणजे 7 मेपासून सुरु होणार आहे. तब्बल दोन महिने हे काम सुरु राहणार असून त्यासाठी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामांमुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. मुंब्रा बायपास रोडचं काम सुरु झाल्यावर ठाण्यात येणारी जड वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात येणार आहे. तसेच शीळफाटामार्गे कल्याणहून भिवंडीच्या दिशेनंही वाहतूक वळवण्यात येणार आहे.
Continues below advertisement