ठाणे : मुंब्रा-बायपासची दुरुस्ती, ऐरोली, शिळफाटा भागात ट्रॅफिक जॅम (सकाळी 7 वाजता)
Continues below advertisement
ठाण्यातल्या मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे आज सकाळपासून ऐरोली, शिळफाटा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. हा बायपास काल रात्रीपासून बंद आहे. दोन महिने हा बायपास दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. रस्त्याच्या कामासाठी ठाण्यात येणारी जड वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे तर कल्याणहून भिवंडीला जाणारी वाहतूक शिळफाटामार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
Continues below advertisement