ठाणे : शेतकऱ्यांच्या मोर्चाला शिवसेनेपाठोपाठ मनसेचाही पाठिंबा
Continues below advertisement
कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे.
किसान सभेच्या या लाँग मार्चला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेनेही पाठिंबा दिला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला.
मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले.
मनसे उद्या ठाण्यात आणि मुंबईत किसान लाँग मार्चाचं जंगी स्वागत करणार आहे.