Ramesh Kadam | जेलमध्ये असलेले रमेश कदम खासगी सोसायटीत कसे? | ABP Majha
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील एका इमारतीतून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कारवाई कराताना पोलिसांना घटनास्थळी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात असलेले रमेश कदम देखील सापडले. ठाणे गुन्हे शाखा युनिट एक आणि निवडणूक विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.