ठाणे : तब्बल 70 मिसळींची चव एकाच ठिकाणी, ठाण्यात मिसळ महोत्सव
Continues below advertisement
ठाणे : मिसळ हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक दर्जेदार पदार्थ आहे. मूग , मटकीची उसळ , पोह्यांचा चिवडा, वरुन सजवलेलं शेवेचं आवरण आणि थोडंसं शिंपडलेलं लिंबू... कुठल्याही हॉटेलात ही अशी सजवलेली मिसळ पाहिली की जिभेला नक्कीच पाणी सुटतं... त्यामुळे ठाणेकरांची मिसळीची तृष्णा भागवण्यासाठी मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.
Continues below advertisement