ठाणे : अमली पदार्थाविरोधात मराठी कलाकार आणि तरुण लोकप्रतिनिधी एकवटले
ठाण्य़ातील तरुणाईला अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मराठी कलाकार आणि तरुण लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक रवी जाधव, विजू माने आणि पूर्वेश सरनाईक यांनी यासंदर्भात बैठक घेतली. अमली पदार्थाविरोधात लढा कसा सुरु करायचा, त्यासाठी काय करायचं, याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी उन्मेष जोशी या समाजसेवकानेही त्यांना साथ दिली.