ठाणे : मासुंदा तलावात घोड्याचा बुडून मृत्यू
ठाण्यातील मासुंदा तलावात एका घोड्याचा बुडून मृत्यू झाला. घोड्याचा माल युसूफ शेख यानं तलावात तीन घोडे अंघोळीसाठी आणले होते. घोड्यांना आंघोळ घालत असताना एका घोड्याच्या पायात दोरी अडकल्यामुळे तो पाण्यात बुडायला लागला. घोडे मालकानं बिथरलेल्या इतर दोन घोड्यांना पाण्याबाहेर काढलं मात्र तोवर पाण्यात बुडत असलेल्या बाबा नावाच्या घोड्याचा बुडून मृत्यू झाला.