ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त गावदेवी मैदानात 18 हजार चौ. फुटांची रांगोळी
Continues below advertisement
गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाण्यामध्ये तब्बल 18 हजार स्क्वेअर फूटांची रांगोळी साकारण्यात आली आहे. शहरातल्या गावदेवी मैदानावर ही रांगोळी साकारण्यात आली आहे. इथल्या रंगवल्ली परिवारातल्या तब्बल 70 कलाकारांनी मिळून 9 तासात या रांगोळीला मूर्त स्वरुप दिलं आहे. ही कलाकृती बनवण्यासाठी तब्बल 900 किलो रांगोळी आणि विविध रंग लागले. येते 3 दिवस ठाणेकर ही रांगोळी पाहू शकतात. गेल्या 17 वर्षांपासून रंगवल्ली परिवार या संस्थेनं ही कला जपली आहे.
Continues below advertisement