ठाणे : खेकड्याचं निळं रक्त विकण्याच्या बहाण्याने फसवणूक
Continues below advertisement
खेकड्याचं निळं रक्त विकण्याच्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या तीन भामट्यांना ठाणे गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांमध्ये दोन नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. हे तिघं फेसबुक आणि मेलवर गिऱ्हाईक म्हणून संपर्क साधायचे आणि खेकड्याचं निळं रक्त परदेशी औषध कंपन्यांना हवं असल्याची बतावणी करायचे. त्यानंतर विक्रेते म्हणून पुन्हा त्याच लोकांना संपर्क साधत आमच्याकडे स्वस्तात खेकड्याचं निळं रक्त उपलब्ध असल्याचं सांगायचे. या खरेदी विक्रीत मोठ्या उत्पन्नाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून अनामत रकमेच्या नावाखाली लाखो रुपये उकळले जायचे. या तिघांकडून दोन महागड्या गाड्या, ३७ मोबाईल फोन्स, २१ डेबिट कार्ड्स, २८ चेक बुक, ४७ विदेशी घड्याळं असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Continues below advertisement