ठाणे : दिवा डम्पिंग ग्राऊंडला वारंवार आग, नागरिकांना त्रास
आता ठाण्यातही डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. दिवा डम्पिंग ग्राऊंडला वरचेवर आग लागत असल्याने दिवाववासियांना श्वसनाच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. कालही डम्पिंग ग्राऊंडला आग लागली. या डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपूनही याठिकाणी कचरा टाकला जात असल्याने अडचणी अजून वाढल्यात. उन्हाळा असल्याने आगी लागण्याचं प्रमाणही वाढलंय. महापालिका या प्रश्नाकडे वारंवार दूर्लक्ष करत असल्याने नागरीक हैराण झालेत.