भिवंडी : शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईच्या वेशीवर दाखल, नाशिकपासूनच्या प्रवासात असह्य त्रास
Continues below advertisement
कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. वाशिंद जवळील पडघा इथं हा मोर्चा दाखल झाला आहे.
त्यांचा आजचा मुक्काम भिवंडी इथं असेल. हजारोंच्या संख्येने निघालेला हा लाँग मार्च 12 मार्चला विधीमंडळावर धडक देणार आहे.
जोवर मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोवर विधीमंडळाला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याआधी राज्यातल्या शेतकऱ्यांनी संप पुकारुन सरकारविरोधातला आपला रोष व्यक्त केला होता. त्यानंतर सरकारनं 35 हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र त्यातून फारसं कुणाच्या हाती काही लागलं नाही, अशी तक्रार समोर येत होती.