ठाणे : क्लस्टर डेव्हलपमेंटच्या कामाला ऑक्टोबरपासून सुरुवात, 13 लाख नागरिकांना घरं : एकनाथ शिंदे
Continues below advertisement
क्लस्टरच्या माध्यमातून संपूर्ण शहराचाच पुनर्विकास करणारं ठाणे हे देशातलं पहिलं शहर ठरणार आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तब्बल 13 लाख नागरिकांना आपल्या हक्काची घरं मिळणार आहेत.
धोकायदाक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना केवळ हक्काची घरंच मिळणार नाहीत, तर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. विकास आराखड्यातील ग्रीन झोन, तलाव, रस्ते या सर्वच स्तरावर विकास होणार असून अॅमिनिटींमध्येही वाढ होणार आहे.
पहिल्या टप्यात ही योजना 5 सेक्टरमध्ये राबवली जाणार असून त्या अंतर्गत तब्बल 23 टक्के परिसराचा विकास केला जाणार आहे. विशेष म्हणजे सीआरझेड अंतर्गत येणाऱ्या बांधकामाचा प्रश्नही निकाली निघणार आहे.