ठाणे : ठाण्यातील गितांजली ग्रुपच्या दोन दुकानांवर ईडीची कारवाई
Continues below advertisement
पंजाब नेशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदीनं देश सोडल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांच्या दुकानांवर ईडीच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली. ठाण्याच्या विवियाना मॉल आणि शॉपर्स स्टॉपमधल्या गितांजली ग्रुपच्या दुकांनांवर छापा टाकण्यात आला. आज सोमवारी सकाळपासून त्याठिकाणी छाप्यात जमा केलेल्या साहित्याचे मोजमाप सुरु होते. छाप्यात जमा केलेला सर्व मुद्देमाल ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यानंतर पुढची कारवाईची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ईडीच्या कारवाईमुळं सकाळपासूनच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये घबरहाटीचे वातावरण होते. तर ठाण्यातील तलावपाळी परिसरातील राजवंत ज्वेलर्सच्या दुकानातही ईडीनं छापा टाकला.
Continues below advertisement