ठाणे : बुलेट ट्रेनच्या महत्कांक्षी प्रकल्पाला दिव्यात पहिला ब्रेक, गावकऱ्यांचा जमीन देण्यास नकार

Continues below advertisement
बुलेट ट्रेनसाठी केंद्र आणि राज्य सरकारनं जरी शक्ती पणाला लावली असली, तरी दिव्यातील अनेक नागरिकांचा बुलेट ट्रेनला कडाडून विरोध होतो आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या जवळपास 108 गावांमधच्या जमिनी या प्रकल्पामुले संपादीत होणार आहेत. धक्कादायक म्हणजे ज्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादीत होणार आहे., त्यांना न विचारतचा प्रशासनानं त्यांच्या जमिनीचं सर्वेक्षण सुरु केलं आहे. त्यामुळेच सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामारे जावं लागतं आहे. सरकारकडून बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहण करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोजदाद करण्यात आली आहे. मात्र, सरकार आणि प्रशासन हे सर्व करताना ज्यांची जमीन अधिग्रहण करणार त्यांनाच विसरल्याचं दिसतं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram