ठाणे, कल्याण आणि कुर्ला, देशातील अस्वच्छ स्थानकं, भारतीय रेल्वेचा सर्व्हे

Continues below advertisement
देशातल्या पहिल्या 10 सर्वात अस्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत मुंबईतील तीन स्थानकांची नोंद झाली आहे. कुर्ला, कल्याण आणि ठाणे या स्थानकांचा यात समावेश आहे. भारतीय रेल्वेकडून 11 ते 17 मे या कालावधीत याबाबतचा सर्व्हे करण्यात आला आहे. अस्वच्छ स्थानकांत उत्तर प्रदेशातल्या कानपूर स्थानकाचा पहिला क्रमांक लागतो.  मुंबईतल्या या तिन्हीही स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कल्याण स्थानकातून दररोज 2 लाख 15 हजार प्रवासी प्रवास करतात. 90 जलद आणि 572 लोकल गाड्या दररोज या स्थानकात येतात. जवळपास 59 टक्के लोकांनी कल्याण स्थानकाच्या अस्वच्छतेबद्धल नाराजी व्यक्त केली आहे. कुर्ला आणि ठाणे स्थानकांच्या बाबतीत हे प्रमाण जवळपास 56 टक्के एवढं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram