ठाणे : पद्मावत विरोधातील करणी सेनेचं आंदोलन मागे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय
Continues below advertisement
पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेनेतर्फे ठाण्यात कऱण्यात येणारं आंदोलन आता मागं घेण्यात आलं आहे...देशभर पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित करावा या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यातल्या करणी सेनेच्या शाखेनं ही भूमिका घेतली आहे..पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेना कोरम मॉल ते विवियाना मॉलदरम्यान आंदोलन करणार होती..मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर करणी सेनेतर्फे आंदोलन मागं घेण्याची भूमिका घेण्यात आली आहे..तर दुसरीकडे धुळ्याला राजपूत समाजाकडून पद्मावत चित्रपटाला विरोध करण्यासाठी मुंबई - आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. जवळपास तासभरत चाललेल्या या रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पोलिसांना निवेदन देऊन रास्तारोको मागे घेण्यात आला.
Continues below advertisement