ठाणे : भिवंडीत अमेझॉनला डिलिव्हरी कंपन्यांकडून तब्बल 2 कोटींचा गंडा

Continues below advertisement
भिवंडीमध्ये अमेझॉनकडून ग्राहकांना येणारे पार्सल फोडून त्याऐवजी साबणाच्या वड्या त्यात भरणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 57 मोबाईल, 3 लॅपटॉप असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत चार जणांना अटक केली असून मुख्य आरोपी  उमेश गुळवी, टेम्पो चालक हुसैन रफिकुद्दीन, अमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ, सचिन पटाळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram